पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाराष्ट्राच्या राजकारणावरुन काँग्रेस आक्रमक; संसद परिसरात आंदोलन

दिल्ली काँग्रेस आंदोलन

महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेच्या मुद्द्याचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहे. महाराष्ट्र सरकार स्थापनेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद परिसरामध्ये काँग्रेस खासदारांनी आंदोलन करत निषेध केला. दरम्यान, 'संविधानाची हत्या बंद करा' अशा घोषणाबाजी करण्यात आल्या.

लोकसभा आणि राज्यसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासाला देखील काँग्रेसच्या खासदारांनी वेलमध्ये उतरुन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. 'बंद करा बंद करा संविधानाची हत्या बंद करा' अशा घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेत सांगितले की, 'मला सभागृहात प्रश्न विचारायचा आहे पण, महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या झाली आहे. तेव्हा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही.', असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस, माकप आणि अन्य विरोधी पक्षाने लोकसभेमध्ये या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी महाराष्ट्राच्या राजकिय परिस्थितीवर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. तर, माकपासह अन्य विरोधी पक्षांनी देखील या मुद्द्यावरुन राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. या गोंधळानंतर राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. तर लोकसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress partys protest in parliament premises over maharashtra government formation issue