पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी राजीनामा दिलाय, लवकर अध्यक्ष निवडा : राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी

वेळ वाया न घालवता काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी योग्य व्यक्तीची निवड लवकरात लवकर करावी, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, राहुल  गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मी काँग्रेसचा दिर्घकालीन अध्यक्ष नाही. मी राजीनामा दिला असून काँग्रेस कार्यकारणीने बैठक बोलावून त्वरित यासंदर्भात निर्णय घ्यावा, असेही ते म्हणाले आहेत.  

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या निर्णयानंतर  काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यांनी पक्षाची जबाबदारी सोडू नये, अशी भूमिकाही मांडली. अनेक नेत्यांनी राहुल गांधींची भेट घेऊन अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेण्यासंदर्भात चर्चा केली. पण राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पुन्हा एकदा त्यांनी निर्णय मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

राहुल गांधींच्या मनधरणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेस नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनीच राहुल यांनी राजीनामा देऊ नये यासाठी त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. एका कार्यकर्त्याने राहुल गांधींनी आपला राजीनामा मागे घ्यावा, यासाठी काँग्रेस कार्यालयाबाहेर गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने त्यावेळी उपस्थितीत असलेल्या पोलिस आणि सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress Party should decide new president quickly I have already submitted my resignation Rahul Gandhi