पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात राजघाटावर काँग्रेसचे आंदोलन

काँग्रेस आंदोलन

नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधात काँग्रेसने महात्मा गांधीचे समाधीस्थळ असलेल्या राजघाटावर आंदोलन केले. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संविधानाने नागरिकांना दिलेल्या अधिकाराचे संरक्षण करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. या आंदोलनावेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि राहुल गांधी यांनी संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली.

झारखंड विधानसभा निकाल, PM मोदी म्हणाले की, ...

राजघाटावर सुरु असलेल्या आंदोलनामध्ये माजी पंतप्रधाना मनमोहन सिंग, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा आणि पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. तसंच, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, गुलाम नबी आजाद, केसी वेणुगोपाल, आनंद शर्मा, दिग्विजय सिंह आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

'भाजपच्या जनविरोधी धोरणांचा झारखंडमध्ये पराभव'

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला. हा कायदा आमच्या राज्यात लागू केला जाणार नाही असे त्यांनी सांगितले, तसंच, हा कायदा लोकशाहीसाठी धोका आहे. पंतप्रधान या कायद्यावरुन देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत. तसंच, केंद्राचा अजेंडा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असल्याची टीका, गहलोत यांनी केली. 

'झारखंडमध्ये आजपासून नवा अध्याय सुरु होईल'

राजघाटवर हे आंदोलन सुरु होण्यापूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सर्व विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आणि या कायाद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

झारखंड निकालानंतर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया