पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीमध्ये काँग्रेसची 'भारत बचाओ रॅली'; मोदी सरकारला घेरणार

राहुल गांधी आणि सोनिया गांधी

काँग्रेस पक्ष आज दिल्लीमध्ये मोदी सरकारच्या विरोधामध्ये 'भारत बचाओ रॅली' काढणार आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिक मंदी, शेतकऱ्यांविरोधातील धोरण, महिला अत्याचार, बेरोजगारी आणि संविधानावर हल्ला यासह विविध मुद्द्यांवर काँग्रेस रॅली काढून मोदी सरकारला घेरणार आहे.

 

दिल्लीत लाकडाच्या वखारीला भीषण आग

'भारत बचाओ रॅली' रॅलीमध्ये काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सर्व मुख्यमंत्री, नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे कार्यकर्ते रामलीला मैदानात दाखल झाले आहेत. रामलीला मैदानावर या रॅलीनिमित्त तयारी करण्यात आली आहे. 

खडसेंनी जाहीर बोलणं टाळायला हवं होतं- फडणवीस

या रॅली दरम्यान काँग्रेस नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा उचलून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे. काँग्रेसने दावा केला आहे की, ही रॅली  ऐतिहासिक होणार आहे. मोदी सरकार महत्वाच्या मुद्द्यांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काँग्रेस याच मुद्द्यांना घेऊन जनतेपर्यंत जाणार आहे. 

मी नेहमीच पंकजा यांच्या पाठिशी उभा राहिलोः देवेंद्र फडणवीस