पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसला आत्मचिंतनाची गरजः ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून वेगवेगळी वक्तव्ये केली जात आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राशिद अल्वी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. आता ज्योतिरादित्य शिंदे यांनीही काँग्रेस पक्षाला सल्ला दिला आहे. मी कोणाच्या विधानावर काहीही भाष्य करणार नाही. पण, सध्या काँग्रेसने आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

शिंदे म्हणाले की, काँग्रेसला आत्मावलोकनाची गरज आहे. सध्या जी स्थिती आहे, त्याचा आढावा घेणे आणि सुधारणा करणे, ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, माझी जबाबदारी स्क्रिनिंग समितीची होती. तिथे पक्षाचे सरचिटणीस खरगे साहेब आहेत. आमची संपूर्ण टीम तिथे आहे. आमचे चार-चार माजी मुख्यमंत्री तिथे आहेत. विद्यमान पीसीसी अध्यक्ष आहेत, सभागृहाचे नेते आहेत. मला विश्वास आहे की, सर्वजण मिळून काम करतील. ही जबाबदारी प्रादेशिक संघटना आणि सरचिटणीसांची असते. ते त्यांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडत आहेत.

राफेल पूजनावरुन खरगेंना निरुपम यांनी दिला घरचा आहेर

तत्पूर्वी, सलमान खुर्शीद यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. ते म्हणाले, आमच्या आग्रहानंतरही राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अनेक जणांनी त्यांना पदावर राहण्याचा आग्रह केला. पण त्यांनी पद सोडलेच. हा त्यांचा निर्णय होता आणि आपल्याला त्यांच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे. 

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस असतानाच राहुल गांधी हे परदेशात गेले. त्यावर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचवेळी खुर्शीद यांनी हे वक्तव्य केले. इतकेच नव्हे तर राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे पक्षासमोरील समस्या वाढल्या असल्याचेही त्यांनी म्हटले.

जेटलींच्या जागेवरुन सुधांशु त्रिवेदी राज्यसभेवर बिनविरोध