पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली हिंसाचारावरुन विरोधक आक्रमक; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

संसदेत विरोधक आक्रमक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनादरम्यान दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विरोधकांनी गोंधळ घालत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दरम्यान, विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचे पोस्टर्स देखील सभागृहात झळकावले. यावेळी पंतप्रधानांनी दिल्ली हिंसाचारावर उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली.

दिल्लीपर्यंत पोहोचला कोरोना विषाणू, देशात २ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकसभेमध्ये गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरुन विरोधकांनी गोंधळ घातला. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचे पोस्टर्स घेऊन विरोधक वेलमध्ये उतरले आणि जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे खासदार आमने-सामने आले आणि त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. या गोंधळानंतर लोकसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. तर राज्यसभेमध्ये देखील विरोधकांच्या गोंधळानंतर कामकाज मंगळवारपर्यंत स्थगित करण्यात आले.

'सरकार न्याय देत नसेल तर मी सुद्धा रस्त्यावर उतरेल'

दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले. दिल्ली हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन काँग्रेससह विरोधी पक्षनेत्यांनी आक्रमक होत संसद परिसरात एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन केले. तर, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, 'तीन दिवस केंद्र सरकार झोपले नसते तर हिंसाचार झालाच नसता.'   

'मातोश्री'बाहेर पिस्तुलासह दरोडेखोराला अटक

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress mps raise slogans in lok sabha demanding resignation of home minister over delhi violence