पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भगवा भारताचा गौरवशाली रंग, टीम इंडियाच्या जर्सीला शशी थरुरांचा पाठिंबा

शशी थरुर

भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमांच्या आधारेच विश्चषकात एका सामन्यासाठी भगव्या रंगाची जर्सी घातली होती, असा दावा करत भगवा रंग हा भारताचा गौरवशाली रंग असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे लोकसभा सदस्य शशी थरुर यांनी केले आहे. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी सामना दरम्यान आपणही भगव्या रंगाचा जॅकेट घातल्याचे थरुर यांनी आवर्जून सांगितले. 

भगव्या जर्सीमुळेच टीम इंडियाचा पराभवः मेहबुबा मुफ्ती

भारताच्या भगव्या रंगाच्या जर्सीचे समर्थन करताना माजी केंद्रीय मंत्री थरुर म्हणाले की, आयसासीच्या एका नव्या नियमात म्हटले आहे की, जेव्हा दोन्ही संघाची जर्सी एकाच रंगाची असते. तेव्हा यजमान देशाच्या संघाला आपल्या जर्सीचा रंग बदलण्याची गरज नाही. पण जर दुसऱ्या संघाला आपली जर्सी बदलायची असेल तर ते बदलू शकतात. त्या नियमानुसारच भारताने भगव्या रंगाची जर्सी निवडली.

भगवी जर्सी परिधान करणे अभिमानास्पदः कोहली

ते पुढे म्हणाले की, यासाठीच मी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यादरम्यान भारताच्या समर्थनात भगव्या रंगाचा जॅकेट परिधान केला होता. 

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने निळा आणि भगव्या रंगाची जर्सी घातली होती. यावर मोठी टीका करण्यात आली होती. अनेक राजकीय पक्षांनी संघाचे भगवेकरण केल्याचा आरोप केला होता. भारत आणि इंग्लंड दोन्ही संघांच्या जर्सीचा रंग निळा असल्याकारणाने भारताला आपल्या जर्सीचा रंग बदलावा लागला होता.

भगव्या जर्सीत पंतचं वर्ल्ड कपमध्ये पदार्पण