लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. काँग्रेस नेते अजूनही त्यांचे मन वळवण्याच्या प्रयत्न करत आहेत. दरम्यान आता काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रतापसिंह बाजवा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
Congress Rajya Sabha MP Pratap Singh Bajwa: Whatever decision Rahul Gandhi will take to improve Congress' image, we are with him. I feel all the senior leaders, whether they are Congress working committee members or present Chief Ministers or state presidents, they should resign. pic.twitter.com/f3A8RCnlwl
— ANI (@ANI) June 30, 2019
काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले आहेत. पक्षासंदर्भातील निर्णय घेण्यासाठी राहुल गांधी यांना पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायला हवे, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रतापसिंह बाजवा यांनी शनिवारी आखिल भारतीय काँग्रेस परराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेसच्या चांगल्या पदाधिकाऱ्यांना भाजपत घ्या, दानवेंचा सल्ला
ते म्हणाले की, पक्षाला पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी राहुल यांना पूर्णपणे निर्णय स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. पक्षासाठी ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मला वाटते की, काँग्रेस कार्यसमिती सदस्यांसह मुख्यमंत्री पदावर असलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राजीनामा द्यायला हवा. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे गांभिर्य नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.
विधानसभा निवडणुकीत 'वंचित'ला बरोबर घेण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत खलबतं