पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी करणार 'समझोता'

भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस प.बंगालमध्ये ममता बॅनर्जींशी करणार 'समजोता'

पश्चिम बंगालमध्ये भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून २०२१ मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची शक्यता पडताळण्यात येत आहेत. यावरुन तृणमूलच्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर काँग्रेसने अनौपचारिक चर्चा सुरु केली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राच्या अखेरच्या आठवड्यात माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तृणमूलचे लोकसभेतील नेते कल्याण बॅनर्जी यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. 'हिंदुस्थान टाइम्स'च्या वृत्तानुसार, राहुल गांधींनी बॅनर्जी यांनी राज्यात मुख्य विरोधी पक्ष म्हणून कोणाला पाहू इच्छिता असा सवाल केला होता. राहुल यांनी काँग्रेस आणि तृणमूलदरम्यान समन्वय वाढवण्याची गरज असल्याचेही सांगितले.

'..तर १०० व्या स्वातंत्र्यदिनी काश्मीर भारताचा भाग नसेल'

यावर आता दोन्ही पक्षांचे प्रमुख ममता बॅनर्जी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी हेच अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात आले.

राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी यांच्या भेटीशिवाय याच मुद्द्यावर तृणमूलचे लोकसभेतील सुदीप बंडोपाध्याय आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यातही अनौपचारिक चर्चा झाली.

डाव्या पक्षांनी भारत-अमेरिकेच्या अणुकरारावरुन यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात २००९ मध्ये आघाडी झाली होती. दोन्ही पक्षांनी २०११ ची विधानसभा निवडणूकही एकत्रित लढवली होती. परंतु, २०१३ मध्ये विविध मुद्द्यांवरुन दोन्ही पक्षात मतभेद झाल्यामुळे ही आघाडी तुटली होती.

पाकिस्तानची कटूता: भारतीय जवानांकडून मिठाई घेण्यास नकार

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, काँग्रेसला बंगालमध्ये आपल्या निवडणुकीच्या रणनीतीवर पुनर्विचार करावा लागणार आहे. बंगाल देशातील तिसरे सर्वांत मोठे निवडणुकीसाठीचे राज्य असून लोकसभेच्या ४२ जागा आहेत. त्यामुळे या राज्यात रणनीती बदलावी लागेल. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही डाव्या पक्षांबरोबर निवडणूक लढवली होती. पण कम्युनिस्ट पक्षाची सद्दी आता संपली आहे. काँग्रेस बंगालमध्ये एकट्याने भाजपला पराभूत करु शकत नाही, हे आम्हाला स्वीकारावे लागेल. 

मागील लोकसभा निवडणुकीत तृणमूलला राज्यात ४३.३ टक्के मते मिळाली होती. भाजपला ४०.३, डाव्या पक्षांना ६.३ टक्के तर काँग्रेसला ५.६ टक्के मते मिळाली होती. २०१९ मध्ये तृणमूलला २२ जागा मिळाल्या होत्या. तर २०१४ मध्ये ३४ जागी त्यांनी विजय मिळवला होता. दुसरीकडे २०१४ मध्ये भाजपला २ जागा मिळाल्या होत्या. तर २०१९ मध्ये तब्बल १८ जागांवर विजय नोंदवला होता. डाव्या पक्षांनातर खातेही उघडता आले नाही. काँग्रेसने दोन जागी विजय मिळवला होता.