पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींनी पदावर कायम राहावं यासाठी काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचा ढिग

राहुल गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा आणि अध्यक्षपदावर कायम राहावं, यासाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षामध्ये राजीनामा देणाऱ्यांची अक्षरशः रांग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी काँग्रेस पक्षातील वेगवेगळ्या पदांवर काम करीत असलेल्या १०० हून अधिक जणांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यांमुळे पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांवरही एकप्रकारे राजीनामा देण्याचा दबाव निर्माण होत असून, त्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या संघटनेत लोकसभा निवडणुकीनंतर अपेक्षित असलेले मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारी बैठकांमध्ये बिस्किटे नको, केवळ पोषक पदार्थ हवे - आरोग्य मंत्री

शुक्रवारी पक्षाचे सरचिटणीस आणि मध्य प्रदेशचे प्रभारी दीपक बाबरिया, गोव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोधनकर, तेलंगणाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पून्नम प्रभाकर, दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष राजेश लिलोथिया, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव प्रकाश जोशी, विरेंद्र राठोड, अनिल चौधरी, राजेश धर्मानी, पक्षाच्या परराष्ट्र धोरण विभागाचे सचिव वीरेंद्र वशिष्ठ, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस नेता डिसुझा यांनीही राजीनामे दिले आहेत.

BCCI ने शेअर केला टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचा फोटो

२५ मे रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. कार्यकारिणीने एकमताने त्यांचा राजीनामा फेटाळला होता. पण त्यानंतरही राहुल गांधी त्यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर आता पक्ष संघटनेतील विविध नेत्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे.