पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA: राहुल आणि प्रियांका गांधींना मेरठ शहराबाहेर पोलिसांनी अडवले

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी

नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधातील आंदोलना दरम्यान, मेरठमध्ये मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी मेरठ येथे दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी मेरठ शहराबाहेरच राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गाडीचा ताफा अडवला. मृत आंदोलकांच्या कुटुंबियांची भेट न घेताच पोलिसांनी त्यांना माघारी लावले. कलम १४४ लागू असल्याचे सांगत पोलिसांनी त्यांना माघारी जाण्यास सांगितले.

 

विमानात बसण्याच्या जागेवरून वाद झाल्यावर प्रज्ञा ठाकूर यांचा खुलासा

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरामध्ये आंदोलन करण्यात आले होते. मेरठमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण आले होते. या आंदोलनावेळी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला होता. तसंच अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.  राहुल गांधी, प्रियांका गांधी, प्रमोद तिवारी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते मृतकांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी दिल्लीवरुन मेरठ येथे आले होते. 

CAA: दिल्लीत पुन्हा आंदोलन; मंडी हाऊस परिसरात जमावबंदी लागू

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गाडीचा ताफा मेरठ शहराच्या परतापूर भागामध्ये दाखल होताच पोलिसांनी अडवला. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी यांना मेरठ शहरामध्ये कलम १४४ लागू असल्याची नोटीस दाखवली. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या गाडीचा ताफा दिल्लीकडे रवाना झाला आहे. 

...म्हणून प्रशांत किशोर यांनी राहुल गांधींचे मानले आभार

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress leaders rahul gandhi and priyanka gandhi who were stopped outside meerut by police