कांद्याच्या वाढत्या दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. संसद परिसरामध्ये काँग्रेसचे खासदार आंदोलन करत आहेत. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु आहे. तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेचे खासदार पी. चिदंबरम संसदेमध्ये दाखल झाले आहेत. ते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
Delhi: Congress leaders, including P Chidambaram protest in Parliament premises over onion prices. pic.twitter.com/R7TWn7UMKD
— ANI (@ANI) December 5, 2019
मुंबईत शिवसेनेला धक्का; ४०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
आर्थिक मंदीनंतर आता कांदा दरवाढीवरुन काँग्रेस मोदी सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेमध्ये कांद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सरकारला घेराव घालणार आहे. सध्या देशामध्ये कांद्याचे दर १०० रुपयांवर गेले आहे. त्यामुळे सर्व सामान्यांच्या जेवणातून कांदा गायब झाला आहे. आधीच महागाईमुळे चिंतेत आलेल्या नागरिकांना कांदा महागल्यामुळे आणखी फटका बसत आहे. त्यामुळे कांद्याच्या दराविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत संसद परिसरात आंदोलन सुरु केले आहे. यावेळी मोदी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.