पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...जीतकर हारनेवाले को केजरीवाल कहते हैं, थरुर यांचा टोला

शशी थरुर आणि अरविंद केजरीवाल

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैयाकुमार विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दिल्ली सरकारने परवानगी दिली आहे. यावरुन काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टि्वट करुन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. जीतकर हारनेवाले को केजरीवाल कहते हैं, असा टोला त्यांनी लगावला आहे. 

घरगुती गॅस सिलिंडर ५२ रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

थरुर यांनी हिंदी चित्रपट 'बाजीगर' चा एक डायलॉगचा उल्लेख करताना केजरीवाल यांच्यावर टीका केली. त्यांनी लिहिले की, हारकर जीतनेवाले को बाजीगर कहते हैं, लेकिन जीतकर हारने वाले को केजरीवाल कहते हैं. इथेच न थांबता थरुर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केजरीवाल यांच्या भेटीवरही भाष्य केले. आता पाच वर्षे आपचे (आम आदमी पार्टी) असेच चालणार. शहा केजरीवाल (ओह सॉरी) वाह केजरीवाल !, अशी टिप्पणी त्यांनी केली. 

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मंगळवारी अमित शहा यांच्याबरोबर दिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली होती. या बैठकीनंतर त्यांनी पोलिस आपले काम करत असून गृहमंत्री अमित शहा यांनी गरज पडल्यास आणखी पोलिस दल पुरवण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे म्हटले होते. तर कन्हैयाविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास परवानगी दिल्यामुळे दिल्ली सरकार विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे. 

तालिबानबरोबर शांतता करार; अमेरिकेने म्हटलं, अफगाणिस्तान सोडणार

भाजप आणि आप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, अशी टीका दिल्ली काँग्रेसने केजरीवाल यांच्यावर केली होती. सीएए असो किंवा एनपीआर..केजरीवाल याबाबत आपचा विचार भाजपसारखच आहे, असे आनंद शर्मा यांनी म्हटले होते.

मुलाने कविता केली..दोन तासांनंतर शेतकरी पित्याची आत्महत्या

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress leader shashi tharoor slams on cm arvind kejriwal on kanhaiya kumar sedition case