पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शशी थरुर यांनी पुन्हा मोदींचे केले कौतुक, आव्हानही स्वीकारले

शशी थरुर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चांगल्या कार्याची प्रशंसा करावी, असे वक्तव्य केल्यानंतर स्वतःच्याच पक्षाच्या नेत्यांच्या निशाण्यावर आलेले काँग्रेसचे नेते खासदार शशी थरुर यांनी पुन्हा एकदा मोदींचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदींनी प्रत्येक दिवशी भारतीय भाषेतील एक शब्द शिकण्याचा दिलेल्या सल्ल्याचे कौतुक करत थरुर यांनी हे आव्हान स्वीकारल्याचे म्हटले आहे. दररोज एक शब्द इंग्रजी, हिंदी आणि मल्याळममध्ये टि्वट करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

केरळमधील तिरुअनंतपूरम मतदारसंघाचे खासदार थरुर यांनी टि्वटमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या एका भाषणाच्या अखेरीस आपल्याला रोज मातृभाषा सोडून इतर भारतीय भाषेतील एक शब्द शिकण्याचा सल्ला दिला आहे. हिंदीच्या प्रभुत्वापासून हटण्याच्या प्रयत्नाचे मी स्वागत करतो आणि आनंदाने या भाषेचे आव्हान पुढे नेईल. 

PM मोदींचं कौतुक करणं शशी थरुर यांना महागात पडणार

थरुर यांनी म्हटले की, पंतप्रधानाच्या भाषेचे आव्हानाच्या प्रत्युत्तरात मी दररोज इंग्रजी, हिंदी आणि मल्याळममधील एक शब्द टि्वट करेन. इतर लोकही असे करु शकतात. आजचा पहिला शब्द बहुवचन आहे. त्यांनी बहुवचन शब्द इंग्रजी आणि मल्याळममध्येही लिहिले. विशेष म्हणजे मोदीं यांचे कौतुक केल्यामुळे थरुर हे सध्या काँग्रेस नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. काँग्रेसनेही त्यांना स्पष्टीकरण मागितले आहे. तरीही थरुर यांनी पुन्हा एकदा मोदींचे कौतुक केले आहे. केरळ प्रदेश काँग्रेस समितीने याप्रकरणी स्पष्टीकरण मागितल्यानंतर थरुर यांनींच पक्षाला सल्ला दिला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress Leader Shashi Tharoor Again Praised Prime Minister Narendra Modi Language challenge