पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली: रणदीप सुरजेवाला

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला

आयएनएक्स मीडिया प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली. त्यांच्या अटकेनंतर संतप्त झालेल्या काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सरकारवर आरोप केला आहे की, 'देशामध्ये सर्वांना शांत करण्याच्या उद्देशाने वरिष्ठ राजकीय नेत्यांवर खोटे आरोप लावले जात आहेत. तसंच गेल्या दोन दिवसांमध्ये दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या झाली आहे. चिदंबरम यांच्यावर अटकेची कारवाई ही सुडभावनेने केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान, आयएनएक्स मीडिया प्रकरणात बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास पी. चिदंबरम यांना दिल्लीतील जोरा बाग निवासस्थानावरुन सीबीआयने अटक केली. बुधवारी त्यांच्याविरोधात ईडीने 'लुकआऊट नोटीस' जारी केली होती. रात्री ८ वाजता चिदंबरम हे काँग्रेस कार्यालयामध्ये दाखल झाले. त्याठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. अखेर रात्री सव्वा दहाच्या सुमार ते त्यांच्या निवासस्थानी गेले असता सीबीआयने त्यांना अटक केली. दरम्यान, आज दुपारी पी. चिदंबरम यांना सीबीआयच्या कोर्टात हजर केले जाणार आहे.

मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान आणि दादर परिसरात जमावबंदी लागू
 
तर, चिदंबरम यांच्या अटकेनंतर त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम हे देखील संतप्त झाले आहेत. त्यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. 'सीबीआयची कारवाई राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहे. काही लोकांना खुश करण्यासाठी सीबीआय ऐवढे मोठे नाटक आणि तमाशा करत आहे, अशी टीका कार्ती चिदंबरमने केली आहे. तसंच कलम ३७० वरुन लक्ष विचलित करण्यासाठी पी. चिदंबरम यांना सीबीआयने अटक केली असल्याचा आरोप कार्ती चिदंबरम यांनी केला आहे. 

कलम ३७० वरुन लक्ष विचलित करण्यासाठी अटक: कार्ती चिदंबरम