पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमध्ये काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या

बिहारमध्ये काँग्रेस नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी काँग्रेस नेते राकेश कुमार यादव यांची गोळ्या झाडून हत्या केली. शनिवारी सकाळी शहरातील सिनेमा रोडवर राकेश कुमार यांची हत्या करण्यात आली.

... म्हणून आंदोलकांना आता धडकी भरली, उत्तर प्रदेश CMO चे ट्विट्स

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी राकेश यादव नेहमीप्रमाणे जीमवर जात होते. त्याचवेळी जीमच्या बाहेर दुचाकीवरुन आलेल्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात राकेश यादव यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राकेश यादव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. 

दिल्ली गारठली; २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

पोलिसांनी सांगितले की, लवकरात लवकर आरोपींना अटक केली जाईल. वैशाली जिल्ह्यात वेगाने वाढणार्‍या गुन्हेगारीविरोधात राकेश यादव नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवत असत. राकेश यादव यांच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी पोलिस ठाण्याच्या परिसरात उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाडीची तोडफोड केली. 

काँग्रेसचा स्थापना दिवस; देशभरात 'संविधान वाचवा' रॅलीचे आयोजन