पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही: राहुल गांधी

राहुल गांधी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 'देश बचाओ रॅली' दरम्यान मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी सांगितले की, भाजप नेत्यांनी संसदेमध्ये राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. मी मरण पत्करेल पण माफी मागणार नाही. सत्य बोललो म्हणून मला माफी मागायला सांगितली जातेय. मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. त्यामुळं मी घाबरणार नाही. माझे नाव राहुल सावरकर नाही. मी राहुल गांधी आहे. सत्य बोलण्यासाठी मी माफी मागणार नाही.', असे राहुल गांधी यांनी सांगितले. दरम्यान, माफी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि अमित शहा यांनी मागावी, असे त्यांनी सांगितले.

 

भाजप असल्यामुळे बेरोजगारी शक्य आहे - प्रियांका गांधी

आपल्या देशाची फाळणी केली जात आहे आणि अर्थव्यवस्थेला कमकुवत केले जात आहे. केंद्र सरकार देशामध्ये आग लावण्याचे काम करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था नष्ट केली आहे. नोटाबंदीच्या वेळी झालेले नुकसान अजून भरुन निघाले नाही. जीएसटीमुळे गेल्या ४५ वर्षातली सर्वात जास्त बेरोजगारी वाढली आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

पालघर ४.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने हादरले

दरम्यान, 'आपल्या शत्रुंना वाटते की भारताच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहचवले जावे. ते काम आपले केंद्र सरकार करत आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारने आपला कॉल रेट ५० टक्क्यांनी वाढवला आहे. या पैशातून ते उद्योजकांचे कर्ज माफ करतील, असे त्यांनी सांगितले. तसंच, जोपर्यंत भारताच्या गरिबांकडे पैसे नाहीत तोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकत नाही. नरेंद्र मोदींनी तुमच्या खिशातून पैसे काढून घेतले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. 

मी नेहमीच पंकजा यांच्या पाठिशी उभा राहिलोः देवेंद्र फडणवीस