पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शपथविधीनंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली राहुल गांधींची भेट

काँग्रेस मंत्र्यांनी घेतली राहुल गांधींची भेट

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी सोहळा झाल्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंगळवारी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल हे देखील उपस्थित होते. तर या मंत्र्यांच्या भेटीसाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आल्या. राहुल गांधी यांच्या भेटीनंतर सर्व मंत्री काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

प्रणिती शिंदेंना डावलले, काँग्रेसच्या महिला नगरसेविकेचा राजीनामा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार केला. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ३५ नेत्यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. २५ कॅबिनेट मंत्री आणि १० राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. विधीमंडळाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काँग्रेसकडून ८ कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्री असे एकूण १० आमदारांनी शपथ घेतली. 

गूड न्यूज : दिल्ली-मुंबई रेल्वेमार्ग लवकरच वेटिंग लिस्ट मुक्त