सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि एनआरसीवर सुरु असलेल्या वादादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. सीएए आणि एनआरसी हा गरिबांवर हल्ला असून हा नागरिकता टॅक्स (कर) असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचा वेळ वाया घातला जात आहे. आधी भारत आणि चीनला संपूर्ण जग एका वेगाने पुढे जाताना पाहत होते. पण आज भारतात फक्त हिंसाचार दिसत आहे. अर्थव्यवस्थेवरुन लक्ष हटवण्यासाठी मोदी सरकार नागरिकत्व कायदा घेऊन आले आहे. पंतप्रधान आपले काम व्यवस्थित करत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
Congress leader Rahul Gandhi: Whether NRC or NPR, it is a tax on the poor, demonetisation was a tax on the poor. It is an attack on poor people, now the poor is asking how will we get jobs? pic.twitter.com/uRtYYy9YTy
— ANI (@ANI) December 27, 2019
छत्तीसगडमध्ये राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवमध्ये सहभागी झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, पूर्वी जग म्हणत होते की, भारत आणि चीन एका वेगाने पुढे जात आहे. पण आता जगाला भारतात हिंसाचार दिसत आहे. रस्त्यावर महिला स्वतःला असुरक्षित समजत आहेत. बेरोजगारी वाढत आहे.
स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या पद्धतीत बदल, नव्या वर्षात OTP आवश्यक
एनसीआर असो किंवा एनपीआर, दोन्ही गरिंबावरील टॅक्स आहे. नोटबंदीवेळी गरिंबांवर टॅक्स होता. हे संपूर्णपणे गरिबांवर आक्रमण आहे. लोकांना नोटबंदीप्रमाणेच रांगते उभा केले जाणार आहे. देशाची वेळ वाया जाणार आहे.
दिल्ली निवडणूकः राजीव सातव यांच्यावर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी
सरकारने अर्थव्यवस्थेवरील लक्ष हटवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. पूर्वी जीडीपी ९ टक्के होता. आज तो ४ टक्क्यांवर आला आहे. तेही नव्या पद्धतीने. जुन्या पद्धतीने या आकडेवारीकडे पाहिल्यास तो ४ पेक्षाही कमी असेल. गरीब नोकरीबाबत विचारत आहे, बेरोजगारी वाढत आहे. महिला सुरक्षित नाहीत.