पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिहारमधील पूरग्रस्तांना मदत करा; राहूल गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

राहुल गांधी

बिहारला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे आलेल्या पूरामुळे बिहारमधील पूरस्थिती खूप गंभीर झाली आहे. बिहार शहरापासून ते गावापर्यंत सगळीकडे पूराचा फटका बसला असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या पूराने आतापर्यंत २९ जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारच्या पूर परिस्थितीवर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पूरग्रस्तांना तातडीची मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

अजितदादांविरोधात मुख्यमंत्री ढाण्या वाघाला मैदानात उतरवणार

राहुल गांधी यांनी सोमवारी ट्विट करत पूरस्थितीवर दु:ख व्यक्त करत असे सांगितले की, 'बिहारमध्ये पूरामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत मी मृतांच्या नातेवाईकांबद्दल शोक व्यक्त करतो. मी काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन करतो की ते पूरग्रस्तांच्या मदत आणि बचाव कार्यात त्वरित सहभागी व्हावे.'

चिदंबरम यांनी झटका, हायकोर्टने जामीन नाकारला

पूरस्थितीमुळे बिहारमध्ये जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. ठिक-ठिकाणी ६- ७ फूटांपर्यंत पाणी साचले आहे. दूध, गॅस, पाणी आणि वीज सेवा ठप्प झाली आहे. तर रस्ते, रेल्वे, विमान सेवा सुध्दा ठप्प झाली आहे. पूरामध्ये अनेक जण अडकले आहेत. स्थानिक प्रशासन, एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. बिहारमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर इन्स्टाग्रामवर