पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

DSP देविंदर सिंहच्या प्रकरणावरुन राहुल गांधींचा मोदी-शहांवर निशाणा

राहुल गांधी

दहशतवाद्यांशी हातमिळवणी करुन देशविरोधी कृत्य करणाऱ्या काश्मीर खोऱ्यातील पोलिस अधिकाऱ्याच्या प्रकरणावरुन काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शाब्दिक तोफ डागली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या मौनाचा अर्थ काय घ्यायचा? असा सवाल राहुल गांधी यांनी मोदी आणि शहांसमोर उपस्थित केलाय. 

DSP देविंदर सिंहची पोलिस दलातून हकालपट्टी

दहशतवाद्यांना साथ देण्याच्या आरोपात अटकेत असलेल्या देविंदर सिंह याच्या विरोधात जलदगतीने खटला चालवावा. या प्रकरणात तो दोषी आढळल्यास त्याला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये त्याची काय भूमिका होती? त्याचे कोणी संरक्षण केले याची चौकशी व्हायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे. काश्मीरमधील पोलिस अधिक्षक्ष देविंद्र सिंह याने तीन दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय दिला होता. त्यांना दिल्लीमध्ये पोहचवत असताना त्याला अटक करण्यात आले, असा उल्लेख राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.  सहा महिन्याच्या आत त्याचे प्रकरण न्यायालयात पोहचायला हवे. जर तो दोषी आढळला तर त्याच्यावर देशद्रोहाविरोधातील कारवाई करा, असेही राहुल गांधींनी म्हटले आहे.  

'इंदिरा गांधी अन् डॉन करीम लाला यांच्या मुंबईत भेटीगाठी व्हायच्या'

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यासोबत अटक करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरचे पोलिस अधीक्षक देविंदर सिंह यांची राज्य पोलिस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणावरुन काँग्रेसने पुलवामाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress leader rahul gandhi attacks PM Narendra Modi and Amit Shah on devinder singh case