पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला, तपासात काय समोर आलं? राहुल गांधींचा सवाल

राहुल गांधी

पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ ला जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी हल्लेखोराने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. आज देशभरात नागरिकांकडून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टि्वट करुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यामुळे सर्वाधिक फायदा कोणाला झाला? या हल्ल्याच्या तपासात काय समोर आले? आणि सरकारमधील कोणत्या व्यक्तीला यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे, अशी प्रश्नांची सरबत्तीच राहुल गांधी यांनी केली आहे. 

पुलवामा : शहिदांच्या कुटुंबीयांची उपेक्षा, आश्वासनांची पूर्तता नाहीच

राहुल यांनी शहीद जवानांच्या पार्थिवाचे छायाचित्र शेअर करत टि्वट केले आहे. आज जेव्हा आम्ही पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या ५० जवानांचे स्मरण करत आहोत. त्यावेळी आपल्याला विचारावे लागेल की, या हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला ? या हल्ल्याच्या तपासात काय निघाले? या हल्ल्याशी निगडीत सुरक्षेतील त्रुटीसाठी भाजप सरकारमध्ये कोणाला उत्तरदायित्व ठरवण्यात आले आहे?

पुलवामा हल्ल्यानंतर श्रीनगर-जम्मू महामार्गावरून जवानांच्या प्रवासात घट

तर सीआरपीएफने आपल्या अधिकृत टि्वटर अकाऊंटवरुन पुलवामा हल्ल्यातील शहीदांना शत-शत नमन केले आणि लिहिले की, 
"तुम्हारे शौर्य के गीत, कर्कश शोर में खोये नहीं।
गर्व इतना था कि हम देर तक रोये नहीं।"

दरम्यान, या हल्ल्याने अवघा देश हादरला, मात्र वर्ष उलटूनही काही शहिदांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी अक्षरश: हेलपाटे घालावे लागत आहेत. शहिदांच्या कुटुंबीयांना अनेक आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्यांची पूर्तता अद्यापही झाली नाही. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress leader rahul gandhi asked three questions from modi government on pulwama terror attack first anniversary