भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आसामच्या इतिहासावर, भाषेवर आणि संस्कृतीवर आक्रमण करु देणार नाही. आसामची सत्ता नागपूरच्या म्हणजेच आरएएसच्या चड्डीवाल्यांच्या हातात द्यायची नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर हल्ला चढवला. काँग्रेस स्थापनादिवसाच्या निमित्ताने गुहाटीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या मुद्यावरुन त्यांनी सरकारवर तोफ डागली.
आपल्या कामाचे बघा, चिदंबरम यांचे लष्करप्रमुखांना प्रत्युत्तर
सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे देशात नोटबंदी सारखे वातावरण निर्माण झाले आहे. आसामसह संपूर्ण देशातील जनतेमध्ये भाजप सरकार भांडण लावून द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. आसामची जनता त्यांना प्रेमाने उत्तर देईल, असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. पुन्हा एकदा नोटबंदीचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. रोजगार, अर्थव्यवस्था हे विषय बाजूला ठेऊन नरेंद्र मोदी सरकारने आता सुधारित नागरिकत्व कायदा आणला आहे.
'२ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचा सरकारकडून वेगळा विचार'
या कायद्याच्या विरोधात आसाममध्ये आंदोलन सुरु आहे. देशभरात हीच अवस्था आहे. जनतेचा आवाज ऐकायला सरकार तयार नाही. जनतेचा आवाज दाबून तरुणांना दबावाखाली चिरडण्याचे काम हे सरकार करत आहे, असा आरोप राहुल गांधींनी भाजप सरकारवर केला. मोदी सरकारचा डाव हाणून पाडायचा असेल तर आपल्याला एकत्रित होऊन लढा द्यावा लागेल. आमच्या संस्कृतीवर, इतिहासावर आणि भाषेवर होणारे आक्रमण खपवून घेणार नाही, असे भाजपच्या नेत्यांना सांगण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी आसामच्या जनतेला केले.
#WATCH Rahul Gandhi in Guwahati: Hum BJP aur RSS ko Assam ki history, bhasha ,sanskriti par akraman nahi karne denge. Assam ko Nagpur nahi chalayega, Assam ko RSS ke chaddi wale nahi chalayenge. Assam ko Assam ki janta chalayegi. pic.twitter.com/hzg4qaPRPv
— ANI (@ANI) December 28, 2019
दुसरीकडे लखनऊ येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी काँग्रेस स्थापना दिनाच्या कार्यक्रमात मोदी सरकारवर तोफ डागली. मोदी सरकार भित्रं असून त्यांचा भित्रेपणा जनतेला समजला आहे. एनआरसी आणि सीएएच्या मुद्द्यावरून जनतेच्या आक्रोशामुळे सरकारचे सूर बदलताना दिसत आहे. त्यातूनच त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे, असे त्या म्हणाल्या आहेत.