पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सात क्षेत्रांत साडेतीन कोटी लोक बेरोजगार, प्रियांका गांधींचा सरकारवर हल्ला

प्रियांका गांधी

देशातील वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारवर सोमवारी जोरदार हल्ला चढविला. या संदर्भात आपल्या ट्विटर हँडलवर केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, नोकऱ्या देण्याच्या सर्व आश्वासनांची वस्तुस्थिती अशी आहे की, देशातील सात मोठ्या क्षेत्रांमध्ये सुमारे साडेतीन कोटी लोक बेरोजगार झालेत. मोठ-मोठी नावे आणि जाहिरातींचा परिणाम असा आहे की तीन कोटी ६४ लाख लोक बेरोजगार झालेत. त्यामुळेच सरकार नोकऱ्यांबद्दल बोलायला कचरत आहे, असा आरोप त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.

एअर इंडियाचे खासगीकरण, आता सर्व हिस्सा विकण्याची सरकारची तयारी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही साडेतीन कोटी लोक बेरोजगार झाल्याचा मुद्दा रविवारी मांडला होता. जर देशातील तरुणांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही तर मग गणतंत्र कसे काय मजबूत होईल, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या माध्यमातील एका बातमीचा उल्लेख करून त्यांनी हे ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रजासत्ताक दिनानिमित्त त्या कोट्यवधी शिक्षित युवकांचा विचार करूया. जे रोजगार मिळवण्यासाठी रोज संघर्ष करताहेत. रोजगार मिळाल्यावरच ते प्रतिष्ठेने जीवन जगू शकतील, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

चीनमध्ये भीषण परिस्थिती; कोरोनामुळे रात्रीत २४ जणांचा मृत्यू

दरम्यान, रायबरेलीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एका मेळाव्यात बोलताना प्रियांका गांधी यांनी म्हटले होते की, भाजप सर्व मुद्द्यांवर खोटं बोलत आहे. त्यांच्या खोटेपणाचा पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सर्वांना सज्ज राहिले पाहिजे.