पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ॐ ऐँ ह्रीं क्लिं चामुँड़ायै विच्चै, मध्यरात्री प्रियांका गांधींचं टि्वट

प्रियांका गांधी

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी सध्या लखनऊ पोलिसांवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आहेत. याचदरम्यान त्यांनी आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन सोमवारी मध्यरात्री एक टि्वट करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. प्रियांका गांधी यांनी दुर्गा सप्तशतीचा एक मंत्र मध्यरात्री टि्वट केला. 

मध्यरात्री १२ वाजून ५५ मिनिटांनी त्यांनी हे टि्वट केले. त्यामध्ये त्यांनी ॐ ऐँ ह्रीं क्लिं चामुँड़ायै विच्चै हा मंत्र टि्वट केला. हा मंत्र टि्वट केल्यानंतर टि्वटर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजर्सने म्हटले की, 'नासमझ को समझना जरूरी नहीं। समझदारों को तो इशारा ही काफी होता है। यह मंत्र नारी शक्ति का प्रतीक है।' 

यूपी पोलिसांनी अराजकता पसरवली, प्रियांका गांधींचा योगी सरकारवर हल्लाबोल

प्रियांका गांधी यांनी आपल्या दोन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यात पोलिसांवर गळा दाबल्याचा आरोप केला होता. परंतु, महिला पोलिस अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले होते. 

Video: CAA समर्थनासाठी PM मोदींनी शेअर केला 'आध्यात्मिक गुरुमंत्र'

तत्पूर्वी, प्रियांका गांधी यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीवरुन योगी आदित्यनाथ सरकार आणि यूपी पोलिसांवर हल्लाबोल केला. राज्यातील हिंसाचारानंतर आता पोलिस अत्याचार करत आहेत. उत्तर प्रदेश पोलिस आणि प्रशासन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बदला घेण्याच्या वक्तव्याच्या आधारे कारवाई करत आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.

मोदी सरकार हे सहन करणार नाही, मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी विद्यापीठांना सुनावले