पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका गांधींना ट्विटरवरुन जीवे मारण्याची धमकी

प्रियांका गांधी

काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. प्रियांका गांधी यांनी केलेल्या एका ट्विटर पोस्टवर एकाने कमेंट करत त्यांना गोळी मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून धमकी देणाऱ्यांचा शोध सुरु आहे. 

३२८ नव्या रुग्णांसह राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ३,६४८ वर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती पांडे नावाच्या ट्विटर आयडीवरुन प्रियांका गांधी यांना धमकी देण्यात आली आहे. प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रासंबंधित न्यूज ट्विट केली होती. या ट्विटवर कमेंटमध्ये आरती पांडे ट्विटर यूजरने प्रियांका गांधी यांना गोळी मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. 

J&K मधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवादी हल्ला, CRPF चे ३ जवान शहीद

हरियाणाच्या माजी मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री करण सिंह दलाल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फोनवरुन त्यांना धमकी देण्यात आली होती.  करण सिंह दलाल यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला आहे.  

एअर इंडियाने उघडली ४ मे पासून देशांतर्गत प्रवासाच्या बुकींगची खिडकी