पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुरुषांकडून सत्ता हिसकावून घ्या, प्रियांका गांधींचा महिलांना सल्ला

प्रियांका गांधी

देशातील महिलांनी सत्ता आपल्या हाती घेऊन सक्षम व्हावे, अशी भावना काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी व्यक्त केली आहे. महिलांना सत्ता मिळायला हवी. मी माझ्या भगिनींना सांगू इच्छिते की, पंचायतीपासून विधानसभेपर्यंतच्या निवडणुकीत सहभागी होत महिलांनी पुरुषांकडून सत्ता हिसकावून घेतली पाहिजे. महिलांच्या हाती सत्ता असेल तर महिलाविरोधी कृत्य करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

बंदूक हिसकावून आरोपीने पहिली गोळी झाडली : पोलीस आयुक्त

उत्तर प्रदेशमध्ये महिला अत्याचारासंदर्भातील वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लखनऊमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये मागील ११ महिन्यात ९० बलात्काराच्या घटना घडल्या. मात्र राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. सरकार महिलांच्या बाजूने आहे की, आरोपींच्या असा संतप्त सवाल उपस्थित करत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेसंदर्भात चिंता व्यक्त केली.  

हैदराबाद एन्काऊंटर: मानवाधिकार आयोगाने दिले चौकशीचे आदेश

नुकतेच उत्तर प्रदेशमधील उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला आरोपींनी पेटवल्याची गंभीर घटना समोर आली होती. पीडित महिला गुरुवारी सकाळी रेल्वे रायबरेलीला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर निघाली असताना आरोपींनी तिला थांबवले आणि तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यात पीडित महिला ९० टक्के भाजली असून दिल्लीतील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती वाचण्याची शक्यता कमी असल्याची माहिती  सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.