पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SPG सुरक्षा काढून घेतल्याबद्दल प्रियांका गांधींचे एका वाक्यात उत्तर

प्रियांका गांधी

विशेष संरक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून घेतल्याच्या मुद्यावर काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. हे राजकारण असून अशा गोष्टी होतच असतात, अशा शब्दांत त्यांनी भाजपला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे विशेष संरक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.

गांधी कुटुंबियांची SPG सुरक्षा काढण्यावरून काँग्रेस आक्रमक

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेल्या एसपीजी संरक्षणाचा आढाव्यामध्ये गांधी कुटुंबियांच्या जीविताला विशेष धोका नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. या आधारावरच गांधी कुटुंबियांना देण्यात आलेले एसपीजी संरक्षण मागे घेण्यात आले होते. काँग्रेसचे सदस्य रवनीत सिंह बिट्टू यांनी प्रश्नोतराचा तासानंतरच्या शून्यकाळात गांधी कुटुंबियांच्या एसपीजी मुद्यावर लोकसभेत प्रश्न उपस्थित केला.

ते म्हणाले की, १९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटना घडल्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षिततेसाठी विशेष संरक्षण गटाची (एसपीजी) स्थापना करण्यात आली होती. पंतप्रधानपदी विराजमान असताना राजीव गांधींना देखील ही सेवा मिळाली होती. राजीव गांधी पंतप्रधान पदावर नसल्यामुळे विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारने त्यांची विशेष सुरक्षा काढून घेतली.  सुरक्षा काढून घेतल्यानंतर त्यांची हत्या घडली. 

'गांधी कुटुंबीयांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय सूडबुद्धीतून'

या घटनेच्या पार्श्वभूमीवर गांधी कुटुंबियांनी विशेष संरक्षण गटाचे (एसपीजी) सुरक्षा कवच देण्यात आले होते. २००४ ते २०१४ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. या काळात अफजल गुरू आणि पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना धोका असल्याचा उल्लेख त्यांनी केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लां यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी अध्यक्षजी तुम्ही सरकारच्या बाजूने आहात असा आरोप रवनीत सिंह बिट्टू यांनी केला. यावर अध्यक्षांनी तुम्हाला पुन्हा बोलण्याची संधी मिळेल, पण तुम्ही असे बोलायला नको होते, असे सुनावले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress leader Priyanka Gandhi Vadra says on removal of SPG cover from her Sonia Gandhi and Rahul Gandhi That is a part of politics It keeps happening