पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजप असल्यामुळे बेरोजगारी शक्य आहे - प्रियांका गांधी

प्रियंका गांधी

दिल्लीमध्ये काँग्रेसने मोदी सरकारविरोधात 'देश बचाओ रॅली काढली आहे. रामलीला मैदानावर या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅली दरम्यान काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. 'मोदी सरकारमुळे चार कोटी रोजगार नष्ट झाले आहेत. भाजपच्या सहा वर्षाच्या सरकारमध्ये जीडीपीची मोठी घसरण झाली आहे. तरी सुध्दा प्रत्येक बस स्टॉपवर मोदी है तो मुमकीन है, अशा जाहिराती दिसत आहेत, अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

धक्कादायक! मालाडमध्ये ७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

'भाजप आहे तर १०० रुपये किलो कांदा शक्य आहे. भाजप आहे तर ४ कोटी रोजगार नष्ट होणे शक्य आहे. भाजप आहे तर ४५ वर्षात सर्वात जास्त बेरोजगारी शक्य आहे. भाजप आहे तर १५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या शक्य आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला करत या कायद्यामुळे देशाला धोका असल्याचे त्यांनी सांगितले.

'CAB' विरोधात मुंबईत आसामी नागरिकांचे आंदोलन

ही रॅली देशाला वाचवण्यासाठी आहे. देशामध्ये महिला अत्याचार आणि बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत त्याला थांबवायचे आहे. प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे देशातील नागरिकांनी आताच आवज उठवणे गरजेचे आहे. जर आपण आज याविरुध्द बोललो नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना नष्ट होईल, असे प्रियांका गांधी यांनी सांगितले. 

पालघर ४.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने हादरले