पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भाजपने गरिबांच्या पोटावर लाथ मारली: प्रियांका गांधी

प्रियांका गांधी

महागाई, आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. किरकोळ महागाई दर ७.३५ टक्क्यांनी वाढल्यावरुन प्रियांका गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'भाजपने गरिबांचा खिसा कापून त्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम केले', असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

मोदी सरकारपुढे आता महागाईचे संकट, काँग्रेसची जोरदार टीका

प्रियांका गांधींनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, 'भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. भाज्या, तेल, डाळ आणि पीठ महागडे झाल्यावर गरीब काय खाणार? असा सवाल प्रियांका गांधींनी केला आहे. तसंच, 'मंदीमुळे गरिबांना नोकरी मिळत नाही. भाजप सरकारने गरिबांचा खिसा कापून त्यांच्या पोटावर लाथ मारली आहे', असे देखील प्रियांका गांधी यांनी सांगितले आहे.

 CAA विरोधात केरळ सरकार आता सुप्रीम कोर्टात

दरम्यान, किरकोळ महागाईचा दर जोरदार वाढीसह डिसेंबर २०१९ मध्ये ७.३५  टक्क्यांवर येऊन पोहोचला. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या समाधानकारक पातळीपेक्षा जास्त आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई देखील वाढली आहे. तसंच, खाद्यपदार्थांचा किरकोळ महागाई दरही सहा वर्षाहून सर्वोच्च पातळीवर १४.१२ टक्क्यांवर आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात प्रथमच अन्न-पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. 

कुटुंब सोडून पळालेल्या पतीला पत्नीकडून कोर्टातच चोप