पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामायण, महाभारतासह डिस्कवरी ऑफ इंडियाही दाखवा, काँग्रेसची मागणी

डिस्कवरी ऑफ इंडिया मालिकेतील दृश्य

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. नागरिकांनी या काळात घरातच राहावे म्हणून सरकारने दूरदर्शनवर २० ते २५ वर्षांपूर्वी गाजलेल्या कार्यक्रमांची मेजवानीच उपलब्ध करुन दिली आहे. लोकप्रिय रामायण, महाभारत, सर्कस, शक्तिमान यासारख्या मालिका पाहण्याची संधी नव्या पिढीला पाहायला मिळत आहे. या जुन्या लोकप्रिय कार्यक्रमाच्या वाढत्या मागणीदरम्यान काँग्रेसने माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या पुस्तकावर आधारित 'डिस्कवरी ऑफ इंडिया' मालिका दाखवण्याची मागणी केली आहे. 

... तर पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान

काँग्रेसचे राज्यातील नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊन दरम्यान दूरदर्शनवर श्याम बेनेगल दिग्दर्शित 'डिस्कवरी ऑफ इंडिया' आणि 'संविधान- मेकिंग ऑफ इंडियन कॉन्सि्टट्यूशन' दाखवण्यात यावे. भारत छोडो आंदोलन (१९४२-१९४६) दरम्यान अहमदनगर किल्ल्यात कैदेत असताना नेहरु यांनी 'डिस्कवरी ऑफ इंडिया' पुस्तक लिहिले होते. यामध्ये त्यांनी भारतीय इतिहास, संस्कृती दर्शनावर लिहिले आहे. हे भारतीय इतिहासावरील चांगल्या पुस्तकांपैकी एक मानले जाते. १९८८ मध्ये या पुस्तकावर टेलिव्हिजनवर मालिका रुपात सादर करण्यात आले होते. 

तबलिग जमातच्या 'त्या' रुग्णांविरोधात रासुका दाखल करा, योगींचे आदेश

माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना लिहिलेल्या पत्रात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, दूरदर्शनवर रामायण, महाभारत आणि शक्तिमान दाखवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. 'डिस्कवरी ऑफ इंडिया' आणि 'संविधान' नागरिकांमध्ये इतिहास आणि आपल्या संविधानाबाबत उत्सुकता जागृत करण्यास मदत करेल. त्याचबरोबर कॉसमॉससारखे लोकप्रिय आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक माहितीपटही दाखवले जावेत. 

पुनर्प्रक्षेपण सुरु केल्यानंतर अल्पावधीत रामायण ही पुन्हा एकदा सर्वाधिक रेटिंग असेलली मालिका ठरली आहे. २०१५ नंतर पहिल्यांदाच हिंदी भाषेतील मालिकेला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहेत. 

धारावीमध्ये डॉक्टरलाच कोरोना; कुटुंबाला केले क्वारंटाईन

त्याचप्रमाणे बार्कच्या यादीतही सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिकांच्या यादीत  रामायणचा समावेश झाला आहे. रामानंद सागर यांची प्रस्तुती असलेले रामायणाचे दिवसातून दोनवेळा पुनर्प्रक्षेपण करण्यात येते. सकाळी ९ आणि रात्री ९ वाजता डीडी नॅशनलवर ही मालिका पुनर्प्रसारित होते.