पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ

पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्लीच्या राउज एव्हेन्यू कोर्टाने माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या न्यायालयीन कोठडीत २७ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे. पी. चिदंबरम यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले होते. चिदंबरम यांची न्यायालयीन कोठडी मुदत आज संपत होती. त्यामुळे त्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर करण्यात आले. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केल्यामुळे त्यांना तिहार कारागृहातच मक्काम करावा लागणार आहे. 

काँग्रेस नेत्यांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरु: उद्धव ठाकरे

याआधी, आयएनएक्स मीडिया प्रकरणात पी. चिदंबरम यांना राउज एव्हेन्यू कोर्टाने १३ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावत त्यांची रवानगी तिहार कारागृहात केली होती. त्यासोबतच ईडीने चिदंबरम यांच्या एका दिवसाच्या कोठडीची मागणी केली होती ती देखील कोर्टाने फेटाळली होती. पी चिदंबरम हे याआधी ईडीच्या कोठडीत होते. कोर्टाने चिदंबरम यांना ३० ऑक्टोबरपर्यंत ईडीच्या कोठडीत पाठवले होते. 

सेना आघाडीसोबत जाऊ नये यासाठी भाजप प्रयत्नशील : पृथ्वीराज चव्हाण

तर दुसरीकडे, सीबीआयने दाखल केलेल्या आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन अर्जावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने असे म्हटले होते की, पी. चिदंबरम यांना इतर कोणत्याही खटल्याची आवश्यकता नसल्यास जामिनावर सुटका करावी. तसेच कोर्टाने हे सुध्दा सांगितले होते की, चिदंबरम कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सीबीआयने अटक केली होती.

'उद्धव ठाकरेंची भेट हीच एक सकारात्मक गोष्ट'