काँग्रेसचे नेते आणि पंजाबमधील आमदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी कर्तारपूर कॉरिडॉर उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडे केली आहे. जयशंकर यांना पत्र लिहून त्यांनी ही विनंती केली आहे.
... या व्यवहारांसाठी पॅनकार्ड आता आवश्यक
आपल्या पत्रामध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे की, येत्या ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या श्री कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या उदघाटन कार्यक्रमासाठी मला पाकिस्तानने निमंत्रित केले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहणे माझ्यासाठी अभिमानाचा आणि श्रद्धेचा क्षण आहे. त्यामुळेच या पवित्र कामासाठी मला पाकिस्तानला जाण्याची परवानगी मिळावी, असे त्यांनी पत्रामध्ये लिहिले आहे.
कर्तारपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी इम्रान खान यांच्याकडून आणखी सवलती
कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा हे शीख बांधवांचे श्रद्धास्थान आहे. कर्तारपूरमधील हा गुरुद्वारा आणि पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक गुरुद्वारा यांना जोडण्यासाठी कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये यासाठी करारही करण्यात आला आहे. या ठिकाणी जाणाऱ्या शीख बांधवांसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन खास सवलती जाहीर केल्या. यामध्ये कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांसाठी पासपोर्ट बाळगण्याची गरज पडणार नाही. फक्त भाविकांकडे इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र असले पाहिजे. त्याचबरोबर कर्तारपूरला जाण्यासाठी १० दिवस आधी नावनोंदणी करण्याची अटही रद्द करण्यात आली.
Congress leader Navjot Singh Sidhu writes to External Affairs Minister, S Jaishankar requesting permission to visit Pakistan, for the inauguration of #KartarpurCorridor pic.twitter.com/BBiykz2Jrp
— ANI (@ANI) November 2, 2019