पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नवज्योत सिंग सिद्धूंनी घेतली सोनिया आणि प्रियांका गांधीची भेट, नवी चर्चा

नवज्योतसिंग सिद्धू

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांची राजधानी नवी दिल्लीत भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. पक्षश्रेष्ठींनी मला भेटीसाठी बोलावले होते. त्यामुळेच मी त्यांची भेट घेतली, असे नवज्योत सिंग सिद्धू यांनी सांगितले.

कुणाल कामरावरील प्रवास बंदी इंडिगोकडून ३ महिन्यांनी कमी

पक्षश्रेष्ठींनी मला भेटण्यासाठी दिल्लीला बोलावले होते. त्यामुळेच मी इथे आलो आणि त्यांची भेट घेतली. सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी या दोन्ही नेत्यांची आपण भेट घेतली आणि त्यांना पंजाबमधील सध्याची स्थिती आणि पक्ष पुढे नेण्यासाठी काय करता येईल, याबद्दल माझे विचार सांगितले, असे नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले.

‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ नावावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

गेल्या अनेक दिवसांपासून नवज्योत सिंग सिद्धू माध्यमांपासून दूर होते. २०२२ मध्ये पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होते आहे. त्यापार्श्वभूमीवर नवज्योत सिंग सिद्धू हे आम आदमी पक्षात जाण्याची शक्यताही वर्तविण्यात येत होती. पण नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी आपमध्ये प्रवेशासंदर्भात कोणताही चर्चा झालेली नसल्याचे आपचे पंजाबमधील प्रमुख भगवंत मान यांनी सांगितले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress leader navjot singh sidhu meets sonia gandhi and priyanka gandhi in delhi discuss over punjab situation