पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये जाणारे केंद्रीय मंत्री डरपोकः मणिशंकर अय्यर

मणिशंकर अय्यर

भाजपचे सरकार देशद्रोही असल्याची जहरी टीका काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केली आहे. केरळ येथील एका सभेत ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याप्रकरणी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. काश्मीरमध्ये केंद्र सरकारच्या ३६ मंत्र्यांना पाठवण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका करत त्यांना डरपोक संबोधले.

अधिकाऱ्यांसाठी 'तान्हाजी'चा खास शो! अजयसह CM ठाकरेही

अय्यर यांनी भाजप सरकारवर आरोप करताना ते धोकेबाज लोक असल्याचे म्हटले. हे लोक (भाजप) जनतेचे प्रतिनिधी नाहीत. जर ते जनेतेचे प्रतिनिधी असते तर अनेक वर्षांपूर्वीच त्यांना सत्ता मिळाली असती. सरकार काश्मीर खोऱ्यात आपले ३६ मंत्री पाठवत आहे. हे लोक इतके डरपोक आहेत की त्यातील ३१ जम्मूमध्ये तर फक्त ६ मंत्री काश्मीरला जाणार आहेत, असे ते म्हणाले. 

सत्ताधाऱ्यांना आव्हानांना सामोरे जावे लागते हे लक्षात ठेवा : PM

दरम्यान, जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात केंद्राच्या संपर्क कार्यक्रमा अंतर्गत ३६ केंद्रीय मंत्री राज्याचा दौरा करणार आहेत. यापैकी केवळ ५ मंत्री ४ दिवसांत काश्मीरचा दौरा करतील. उर्वरित. जम्मूचा दौरा करतील. हे मंत्री जनतेशी संवाद साधतील आणि त्यांच्या विकासावर चर्चा करतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

शिर्डी वादासंदर्भात CM ठाकरेंसोबतच्या चर्चेनंतर विखे-पाटील म्हणाले...