पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिब्बल म्हणाले, मोदीजी CAA, NRC वाद विसरुन कोरोनाविरोधात एकत्र लढू

काँग्रेस नेता कपिल सिब्बल

कोरोना विषाणूच्या देशातील वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय योजना आखणे गरजेचे आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने भारताची डोकेदुखी देखील वाढवली असून सरकार आणि प्रशासनाकडून यावर अनेक उपाय योजना करण्यात येत आहेत. देशावर ओढवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही जूने मुद्दे बाजूला ठेवून मोदी सरकारसोबत आहोत, असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कोरोना विषाणूसंदर्भातील उपाय योजनेसंदर्भात राष्ट्रीय रणनिती आखण्याची आवश्यकता असल्याचे बोलून दाखवले. 

लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीला परवानगी नाहीच, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण

कपिल सिब्बल म्हणाले की, सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यासारखे मुद्दे आता मागे पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या लढ्यावर लक्षकेंद्रीत करावे. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन देशातील संकटाला सामोरे जावे लागेल.  ते पुढे म्हणाले की, सरकारने लॉकडाउनसंदर्भातील उपाय योजनेसंदर्भात पुन्हा एकदा विचार करण्याची आवश्यकता आहे. लोक आणि अर्थव्यवस्थेची ताळाबंदी करुन हा प्रश्न सुटणार नाही. कोरोनाविरोधातील लढा जिंकायचा असेल तर यापुढे जाऊन विचार करायला हवा. केंद्र सरकारने यासाठी राष्ट्रीय योजना आखायला हवी. यासाठी त्यांनी आपत्कालीन अधिनयम २००५ मधील अनुच्छेद ११ चा संदर्भही दिला. या अधिनियमानुरा राष्ट्रीय स्तरावर योजना तयार करावी, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली आहे. २४ एप्रिलपासून आतापर्यंत लॉकडाउनला चार आठवड्याचा कालावधी उलटला आहे. मात्र केंद्र सरकारने कोणतीही राष्ट्रीय योजना तयार केलेली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

कोरोनाच्या मुद्यावरुन चीनची कोंडी करण्यासाठी अमेरिकेकडून मोर्चेबांधणी

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. २४  हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून ७७५ लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत जवळपास ५ हजारहून अधिक रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत.   
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress leader kapil sibal says caa nrc are past things pm modi should focus on coronavirus