पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे

काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा मंगळवारी राजीनामा दिला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. गेल्या १८ वर्षांपासून ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पण गेल्या वर्षभरापासून त्यांनी काँग्रेस नेतृत्त्वापासून लांब राहण्यास सुरुवात केली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी आपल्या सोशल हँडलवरील प्राथमिक माहितीतून काँग्रेस नेता असा उल्लेखही हटविला होता. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रसने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ज्योतिरादित्य शिंदे यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. सोनिया गांधी यांनी याला मंजुरी दिली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. 

ज्योतिरादित्य शिंदेंनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या तीन नेत्यांमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला असल्याचे पत्र समोर आले. त्यांच्या पत्रावर सोमवार, ९ मार्चची तारीख आहे. पण हे पत्र मंगळवारी, १० मार्चला माध्यमांसमोर आले. 

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा घसरण; वाचा आजचे दर

काँग्रेसमध्ये राहून आपल्या देशाची आणि राज्यातील लोकांची सेवा करणे मला शक्य होत नाही, असे मला जाणवत आहे. माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि लोकांची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नवी सुरुवात करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress leader Jyotiraditya Scindia tenders resignation to Congress President Sonia Gandhi