पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही'

ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मंजूर झाले. काँग्रेसने या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. मात्र या विधेयकाला विरोध करणाऱ्या शिवसेना खासदारांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केल्यामुळे काँग्रेस नाराज झाली आहे. 'शिवसेनेने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केले हे योग्य नाही, अशी नाराजी काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

... तर अमित शहांवर अमेरिकेने निर्बंध घालावेत, अमेरिकी आयोगाची मागणी

शिवसेना नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याऐवजी अलिप्त राहू शकली असती. आम्ही या विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. मात्र त्यांनी या विधेयकाच्या बाजूने का मतदान केले हे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया हुसेन दलवाई यांनी दिली आहे. 

शिवसेनेसोबत जाण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाचा अमित शहांकडून असा

या विधेयकाबाबत बोलताना हुसेन दलवाई यांनी पुढे असे सांगितले की, समाजामध्ये फूट पाडण्यासाठी नागरिकत्व विधेयक आणलं गेले आहे. देशामध्ये बेरोजगारी, आर्थिक मंदी, शेतकऱ्यांचे प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवण्याऐवजी भाजप समजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे समाजाला धरुन नाही. भाजप राज्यघटना मानत नाही असे देखील त्यांनी सांगितले. 

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा; दोघांचा मृत्यू

तसंच, हे विधयक संसदेत मंजूर झाले तरी सुप्रीम कोर्टात टिकेल असे मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया देखील दलवाई यांनी दिली आहे. दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकाच्या बाजूने ३११ खासदारांनी मतदान केले तर विरोधामध्ये ८० खासदारांनी मतदान केले. तब्बल १२ तासांच्या चर्चेनंतर सोमवारी रात्री नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. 

शैक्षणिक सहलीसाठी जाणाऱ्या बसला अपघात; ७ जण जखमी