पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काँग्रेसचे दिग्गज नेते डीके शिवकुमार यांना ईडीकडून अटक

डीके शिवकुमार

कर्नाटकचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते डीके शिवकुमार यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात (मनी लॉड्रिंग) त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीकडून त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये डीके शिवकुमार यांच्यासह आणखी दोघांवर आर्थिक गैरव्यहाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी डी शिवकुमार तिसऱ्यांदा ईडीच्या चौकशीला सामोरे गेले होते. यापूर्वी शुक्रवार आणि शनिवारी ईडीने त्यांची १३ तासांहून अधिक वेळ चौकशी केली होती. २०१६ मध्ये केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतल्यापासून ते ईडीच्या रडारवर होते.

२ ऑगस्ट २०१७ मध्ये आयकर विभागने त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी छापेमारी केली होती. यावेळी त्यांच्याकडून  ८.५९ कोटी रक्कम जप्त करण्यात आली होती. ही बेहिशोबी रक्कम आढळल्यानंतर आयकर विभागने त्यांच्यासह अन्य दोघांवर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress leader DK Shivakumar arrested by Enforcement Directorate ED under Prevention of Money Laundering Act