पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आता काँग्रेस नेत्यानेही केलं कलम ३७० हटवण्याचे स्वागत

भुपिंदरसिंग हुड्डा

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता भुपिंदरसिंग हुड्डा यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. हुड्डा यांनी रोहतक येथील कार्यक्रमात मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. 

हुड्डा म्हणाले की, मी देशभक्तीबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. त्यामुळेच मी कलम ३७० हटवण्याचे समर्थन करतोय. ते पुढे म्हणाले. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवल्याचा आमच्या पक्षातील काहींनी विरोध केला. मात्र सरकारच्या या निर्णय मला योग्य वाटतो. काँग्रेस मार्ग भरकटलेला पक्ष आहे, असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.  

जम्मूत ५ जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद

काँग्रेसचा घरचा आहेर देताना ते म्हणाले की, पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही. जेव्हा देशभक्ती आणि स्वाभिमानाची गोष्ट येते तेव्हा मी कोणतीही तडजोड करणार नाही. हरियाणा सरकारने या निर्णयातून दिशाभूल करु नये. त्यांनी पाच वर्षांत राज्यासाठी काय केले याचा हिशोब द्यावा, असा टोलाही त्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपला लगावला.

आता चर्चा फक्त POKवरच, राजनाथ सिंह यांनी ठणकावलं