पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माझ्यासह कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल नाही : पी. चिदंबरम

पी. चिदंबरम

आयएनएक्स मीडिया प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर गायब असेलेले माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडले. दिल्लीतील काँग्रेस भवनात त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. माझ्यावर किंवा माझ्या कुंटुंबियांवर कोणतेही आरोपपत्र दाखल नाही. मी पळून गेलेलो नव्हतो. तर न्यायालयीन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मी माझ्या वकिलांसोबत होते. याप्रकरणात आम्हाला अडकवण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. 

चिदंबरम यांच्या याचिकेवर SC म्हणाले, तत्काळ सुनावणी अशक्य!

सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) त्यांच्याविरोधात 'लुकआऊट नोटीस' जारी केली होती. दरम्यान, उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सीबीआयची टीम त्यांच्या घरी दाखल झाली होती. मात्र पी. चिदंबरम घरी उपस्थित नसल्यामुळे सीबीआयची टीमला मोकळ्या हाती जावे लागले होते. 

चिदंबरम यांना दुसरा धक्का, ईडीकडून लुकआऊट नोटीस जारी

यावरही चिदंबरम यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. रात्रीपासून वकिलांसोबत कागदपत्रे तयार करत होतो, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत चिदंबरम म्हणाले की, या प्रकरणाबाबतची सुनावणी सूचीबद्ध करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले. आपली बाजू मांडल्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे न देता काँग्रेस कार्यालयातून बाहेर पडले. ते कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर सीबीआय टीम काँग्रेस कार्यालयात पोहचली होती. चिदंबरम हे आपल्या निवास्थानी गेल्याचे वृत्त आहे. सीबीआय त्यांचा पाठलाग करुन कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Congress leader and former Finance Ministe p chidambaram press conference at AICC headquarters in Delhi