पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने केली अटक

पी. चिदंबरम यांना त्यांच्या निवासस्थानावरुन ताब्यात घेण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयातील आयएनएक्स मीडिया प्रकरणातील अटकपूर्व जामीनावरील सुनावणीपूर्वीच सीबीआयने माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना दिल्लीतील  जोरा बाग निवासस्थानावरुन अटक केली आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेस स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर लगेचच सक्त वसुली संचालनालयानेही (ईडी) त्यांच्याविरोधात 'लुकआऊट नोटीस' जारी केली होती. दिल्ली न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात गेल्या २७ तासांपासून चिदंबरम गायब होते.  

माझ्यासह कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल नाही : पी. चिदंबरम

या प्रकरणात काँग्रेस भवनात काँग्रेसकडून पत्रकार परिषदेत बोलवण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत पी. चिदंबरम यांनी आश्चर्यकाररित्या उपस्थिती लावली. आपली बाजू मांडल्यानंतर अवघ्या १० मिनिटांची पत्रकार परिषद आटोपून चिदंबरम आपल्या जोर बाग निवासस्थानी पोहचले.

चिदंबरम यांच्या याचिकेवर SC म्हणाले, तत्काळ सुनावणी अशक्य!

चिदंबरम पत्रकार परिषदेत असल्याची माहिती मिळताच सीबीआयचे पथक काँग्रेस भवनात दाखल झाले होते. मात्र, पथक दाखल होण्यापूर्वीच चिदंबरम येथून निघून गेले होते. त्यानंतर सीबीआयने आपला मोर्चा त्यांच्या निवासस्थानी वळवला. चिदंबरम यांच्या निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या सर्व गोंधळानंतर सीबीआय आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी चिदंबरम यांना अटक केली. तब्बल ५२ मिनिटांच्या प्रक्रियेनंतर चिदंबरम यांना सीबीआयने अटक केले. 

 'ईडीच्या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही'