लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते आणि काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष करायला हवे अशी खोचक मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. मलिक यांची वर्तणूक आणि व्यवहार भाजपच्या नेत्यांप्रमाणे असल्याची टीकाही त्यांनी केली.
Adhir Ranjan Chowdhury, Congress: I think the Governor of Jammu & Kashmir should be made the BJP (Bharatiya Janata Party) President for J&K because his behaviour as well as his statements are more like that of a BJP leader. pic.twitter.com/z1uoz8uxZt
— ANI (@ANI) August 26, 2019
दरम्यान, कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये सातत्याने स्थिती सुधारत आहे. त्यामुळे प्रशासनाने राज्यातील बहुतांश ठिकाणी लँडलाइन टेलिफोन सेवा सुरु केली आहे.
जम्मू-काश्मीरः दगडफेकीत स्थानिक ट्रक चालकाचा मृत्यू
औषधांचा कमतरता नाही, फोनवरील बंदीमुळे अनेकांचा जीव वाचलाः मलिक
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी रविवारी राज्यात औषधे आणि आवश्यक वस्तूंची कमतरता नसल्याचे स्पष्ट करताना फोनवरील बंदीमुळे अनेकांचा जीव वाचल्याचा दावा केला. काश्मीर खोऱ्यातील अनेक औषधांची दुकाने उघडली होती.
प्रशासनाने जारी केलेल्या एका निवेदनानुसार श्रीनगरमधील औषधांच्या १६६६ दुकानांपैकी ११६५ दुकाने रविवारी उघडली. काश्मीर खोऱ्यात ७६३० औषध विक्रेते आहेत. त्यातील ४३३१ दुकाने सुरु होती.
काश्मीरमध्ये सलग २१ व्या दिवशी दुकाने आणि व्यावसायिक संस्था बंद होते. सार्वजनिक वाहनेही बंद आहेत. आठवडी बाजारांची हीच स्थिती आहे. शहरातील काही भागात थोड्याफार प्रमाणात फेरीवाले विक्री करत आहेत.