पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प भगवान राम आहेत का?; काँग्रेस नेत्याचा सवाल

डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून जय्यत तयारी सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी ७० लाख भारतीय जमणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. यावर टीका करत काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प भगवान राम आहेत का?, असा सवाल त्यांनी केला आहे. 

शिवाजी महाराजांचे कार्य लाखोंना प्रेरणा देत राहिल - नरेंद्र मोदी

अधीर रंजन चौधरी यांनी असे म्हटले आहे की, 'अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भगवान राम आहेत का? ते फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. मग त्यांच्या स्वागतासाठी ७ लाख भारतीयांना उभं करण्यासाठी गरज काय? असा सवाल उपस्थित करत ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी भारतीय लोकं उभी राहणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. तसंच, डोनाल्ड ट्रम्प यांना व्यापार करार करायचा नाही. ते आपले हित साधण्यासाठी भारतात येत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. 

मोदी माझे आवडते, पण भारताशी तूर्त व्यापार करार नाही - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसांच्या ट्रम्प यांच्या भारत दौऱ्या दरम्यान ते अहमदाबाद येथे जाणार आहेत. ट्रम्प यांनी या दौऱ्यासंदर्भात असे सांगितले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना सांगितले की त्यांच्या स्वागतासाठी विमातळापासून ते स्टेडिअमपर्यंत ७ लाख भारतीय नागरिक उभे राहणार आहेत. 

कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट, चीनमधील मृतांचा आकडा २००० पार