पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आरबीआयकडून मदत म्हणजे अर्थव्यवस्था रुग्णशय्येवर, काँग्रेसची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) केंद्र सरकारला लाभांश आणि अतिरिक्त निधीतून १.७६ लाख कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आरबीआयकडून बेलआऊट पॅकेज घेणे म्हणजेच अर्थव्यवस्था वाईट स्थितीत असल्याचा हा पुरावा आहे, असा आरोप काँग्रेसने केलाय. 

अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर होणार?, RBI सरकारला देणार १.७६ लाख कोटी

सरकारने या पैशांचा कुठे वापर करणार हे सांगितले नसल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, सरकारकडून स्वतःला प्रोत्साहन पॅकेज घेणे याचाच अर्थ भारतीय अर्थव्यवस्था संकटात आहे. सरकार आपल्या एका संस्थेच्या म्हणजेच आरबीआयकडून मिळणाऱ्या देशांतर्गत अनुदानावर अवलंबून आहे. 

ते पुढे म्हणाले, या पैशांच्या वापरावरुन एखाद्या योजनेचा खुलासा केलेला नाही. जर हे पैसे गरज नसलेल्या क्षेत्रात किंवा प्रशासनावर खर्च होणार असतील तर यामुळे अडचणी निर्माण होतील. जर हे सरकार स्वतः आरबीआयकडून प्रोत्साहन पॅकेज घेत असतील तर वाहन, लघु उद्योग, बांधकामसारख्या वाईट अवस्था असलेल्या क्षेत्रांना ते कशी मदत करतील, असा सवालही त्यांनी केला.

दरम्यान, आरबीआयने सोमवारी केंद्र सरकारला लाभांश आणि अतिरिक्त राखीव निधीतून विक्रमी १.७६ लाख कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. या निधीतून सरकारला लोककल्याणकारी योजना राबवण्यासाठी मोठी मदत मिळेल. या निधीच्या माध्यमातून सरकार अर्थव्यवस्थेला गती येण्यासाठी मोठे निर्णय घेऊ शकते. आरबीआयने माजी गव्हर्नर बिमल जालान समितीच्या शिफारशींच्या आधारे केंद्र सरकारला विक्रमी १.७६ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली.