पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ब्रिटिश खासदाराला परत पाठवल्याचे काँग्रेस नेत्याने केले समर्थन, म्हणाले...

डेबी अब्राहम

मोदी सरकारच्या काश्मीर धोरणाला विरोध करणाऱ्या ब्रिटिश खासदार डेबी अब्राहम यांना नवी दिल्ली विमानतळावरूनच परत पाठवण्यात आले. सोमवारी डेबी अब्राहम दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्या. त्यावेळी त्यांचा व्हिसा रद्द करत त्यांना परत पाठवण्यात आले. सरकारच्या या निर्णयावरुन अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. असा निर्णय घेणे आवश्यक होते, असे अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितले.

राज्याची काय पूर्ण देशाचीच निवडणूक घ्या; पवारांचे फडणवीसांना आव्हान

काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी मंगळवारी सकाळी ट्विट करत असे म्हटले आहे की, 'डेबी अब्राहमला भारताकडून परत पाठविणे फार महत्वाचे होते. ती फक्त ब्रिटीश खासदार नव्हती, तर ती पाकिस्तानची समर्थक होती. पाकिस्तान सरकार, आयएसआयसाठी काम करणारी अशी तिची ओळख आहे. भारताचे सार्वभौमत्व वेगळे करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातील ते नाकारणे आवश्यक आहे.'

'एल्गार परिषदेबाबत केंद्राने एवढी तत्परता का दाखवली?'

दरम्यान, सोमवारी एक ट्विट करत डेबी अब्राहमने भारत सरकारवर आरोप केला होता. तिने असा दावा केला होती की, 'तिचा व्हिसा ऑक्टोबर २०२० पर्यंत आहे. मात्र तिच्या राजकीय वक्तव्यांमुळे तिला भारतात प्रवेश नाकारण्यात आला.' तर, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी सुद्धा असा दावा केला आहे की, 'डेबी अब्राहमचा व्हिसा कधीच रद्द झाला आहे. याबाबत त्यांना माहिती देण्यात आली होती. तरी सुद्धा त्या भारतात आल्या.' दरम्यान, डेबी अब्राहम यांनी काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.

भीमा-कोरेगावचा तपास केंद्राला दिलेला नाही, उद्धव ठाकरेंचा खुलासा