लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होणे निश्चित आहे. आघाडीत यंदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भुमिकेत नसेल. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी ही राष्ट्रवादीपेक्षा वाईट ठरली आहे. अशावेळी विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांमध्ये समसमान जागा वाटप होण्याची शक्यता आहे.
..नाहीतर रामराजेंची जीभ हासडली असतीः उदयनराजे
नेहमी राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा घेतल्या
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी अनेक वर्षांपासून आहे. पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेहमी मोठ्या भावाची भुमिकेत राहिली आहे. काँग्रेसने नेहमी राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा घेतल्या आहेत. परंतु, यंदा परिस्थिती बदलली आहे. अशावेळी काँग्रेससाठी स्थिती सोपी राहिलेली नाही.
मुंबईतील जास्त जागांवर राष्ट्रवादीचा डोळा, काँग्रेसची भूमिका निर्णायक
दोघांच्या मतात कमी अंतर
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी केली होती. काँग्रेसने २६ तर राष्ट्रवादीने २२ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने अवघ्या एका जागेवर विजय मिळवला होता. जर राष्ट्रवादीने ४ जागा राखल्या होत्या. मतदानाच्या टक्केवारीत दोन्ही पक्षांमध्ये मोठा फरक नाही. विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या मतांची टक्केवारी कमी झाली आहे.
एकट्याने लढल्यास नुकसान
मागील विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. एकट्याने लढल्याने काँग्रेसच्या मतात ४ टक्क्यांनी घट झाली. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ४२ तर राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या होत्या.
'EVM मध्ये नाही, तर निवडणूक अधिकाऱ्याकडील मशीनमध्ये गडबड'
काँग्रेसचा जनाधार घटला
राष्ट्रवादीच्या एक ज्येष्ठ नेत्याने म्हटले की, महाराष्ट्रात काँग्रेस सातत्याने आपला जनाधार गमावत आहे. मागील २० वर्षांपासून त्यांच्या मतांच्या टक्केवारीत घट होत आहे. अशावेळी आम्ही जागा वाटपावेळी बरोबरीची मागणी करणार आहोत.