पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हिंदूंना शिव्या आणि मुस्लिमांबद्दल प्रेम हेच तर काँग्रेस करत आलाय'

संबित पात्रा

केवळ भाजपला रोखण्यासाठी आणि मुस्लिमांसाठी काँग्रेसने सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील सध्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले होते. याला बुधवारी भाजपने प्रत्युत्तर दिले. हिंदूंना शिव्या देणे आणि मुस्लिमांचे संतुष्टीकरण करण्याचे काम काँग्रेसकडून अनेक वर्षांपासून केले जाते आहे. त्यामुळे त्या पक्षाने आपले नाव इंडियन नॅशनल काँग्रेसऐवजी मुस्लिम लीग काँग्रेस करावे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढविला.

ई-तिकीटांचा काळाबाजार आणि दहशतवाद्यांना मदत करणारी टोळी जेरबंद

ते म्हणाले, कोणालाही कायद्याविरोधात आंदोलने करण्याचा अधिकार आहे. हेच तर लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. पण विरोध करताना लोकांच्या मनात विष पेरले जायला नको. एका धर्माच्या संतुष्टीकरणासाठी दुसऱ्याला शिव्या घालण्याचे काम केले गेले नाही पाहिजे. आम्ही मुस्लिमांसाठी सरकार बनवले, असे म्हणणे उचित नाही. केवळ सत्तेसाठी काँग्रेसने मुस्लिमांवर प्रेम केले. शाहीन बागेत लहान मुलांच्या मनात विष पेरण्याचे काम कोणी केले याचा तपास केला पाहिजे, असेही संबित पात्रा म्हणाले.

अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

केंद्राची बाजू ऐकल्याशिवाय CAA ला स्थगिती नाही - सुप्रीम कोर्ट

केवळ भाजपला रोखण्यासाठी आणि मुस्लिमांसाठी काँग्रेसने राज्यातील सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे अशोक चव्हाण यांनी मुस्लिम समुदायाच्या एका कार्यक्रमात सांगितले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे.