पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धार्मिक आधारावर देशात फूट पाडणे हाच CAA चा उद्देश : सोनिया गांधी

सोनिया गांधी

नव्या वर्षाची सुरुवात ही संघर्ष, आर्थिक समस्या आणि हिंसाचार यासारख्या गोष्टींनी झाली आहे, अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. काँग्रेसच्या कार्यकारणी समितीच्या बैठकीत त्यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भातही भाष्य केले. धार्मिक आधारावर देशात फूट पाडण्याच्या उद्देशाने सुधारित नागरिकत्व कायदा आणला आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. 

चिंचवडमध्ये फडणवीस म्हणाले, 'मी पुन्हा येईन'

दिल्लीतील जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये झालेल्या हिंसाचाराचाही सोनिया गांधी यांनी निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांना मारहाण झालेल्या घटनेच्या चौकशीसाठी विशेष समितीची स्थापना करा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. 
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केसी वेणुगोपाल, महासचिव प्रियांका गांधी, ज्येष्ठ नेते अहमद पटले. एके अँन्टोनी, मल्लिकार्जून खरगे यांच्यासह अन्य काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती.  

साहित्य संमेलनाच्या मंचावर गोंधळ, परिसंवादाच्या विषयावर आक्षेप

या बैठकीत सुधारित नागरिकत्व कायद्यासंदर्भातील विरोधात सुरु असलेलेली आंदोलने, जेएनयू हिंसाचाराची घटना आणि देशातील आर्थिक समस्येवर चर्चा करण्यात आली. याशिवाय अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीनंतर पश्चिम आशियाई भागातील परिणांमांसदर्भातही चर्चा करण्यात आली. सुधारित नागरिकत्व कायदा शुक्रवारपासून देशभरात लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये  होत असलेल्या अत्याचारामुळे  भारताच्या आश्रयाला आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ईसाई समाजातील लोकांना भारतीय नागरिकत्व मिळणार आहे. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत जे भारतात आले आहेत त्यांनाच या कायद्याचा आधार घेऊन भारतात वैधरित्या वास्तव्य करता येणार आहे.