पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चिदंबरम यांना भेटण्यासाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहार तुरुंगात

चिदंबरम यांना भेटण्यासाठी सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग दोघेही तिहार तुरुंगात जाताना

आयएनएक्स मीडिया प्रकरणात सध्या तिहार तुरुंगात असलेले देशाचे माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांची भेट घेण्यासाठी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सोमवारी सकाळी तुरुंगामध्ये पोहोचले. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते अहमद पटेल आणि गुलामनबी आझाद यांनीही तिहार तुरुंगात जाऊन चिदंबरम यांची भेट घेतली होती. 

ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि उद्योजक माधव आपटे यांचे निधन

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग हे दोघेही चिदंबरम यांना भेटण्यासाठी थेट तिहार तुरुंगात गेल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काँग्रेस पक्ष चिदंबरम यांच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, हे सांगण्यासाठीच सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहार तुरुंगात गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

राष्ट्रवादीच्या उमेदवार नमिता मुंदडा पक्ष सोडण्याच्या तयारीत

चिदंबरम यांच्याशी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर यावेळी चर्चा होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. चिदंबरम यांच्या वकिलांनी याआधीच त्यांच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. पण त्यावर अद्याप न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून, आजच ही सुनावणी होण्याची शक्यता आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:congress interim president sonia gandhi and former pm dr manmohan singh arrive at tihar jail to meet p chidambaram